पिंपरी-चिंचवड

मुऱ्हे यांचा बैलगाडा ठरला दुहेरी मुकुटाचा मानकरी

CD

इंदोरी, ता. ३ ः ग्रामदैवत कडजाई मातेचा वार्षिक उत्सव धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांबरोबरच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला. बैलगाडा शर्यतीत १५६ बैलगाडे सहभागी झाले होते. फायनल प्रथम क्रमांक व घाटाचा राजा असा दुहेरी मुकुटाचा मानकरी सोमाटणे (मावळ) येथील कांचन मुऱ्हे यांचा बैलगाडा ठरला.

काकड आरती, महापूजा, अभिषेक, पालखी छबिना मिरवणूक व ग्रामप्रदक्षिणा या धार्मिक कार्यक्रमांसह ऑर्केस्ट्रा तसेच डीजे शो हे करमणुकीचे कार्यक्रम पार पडले, अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल पवार, कार्याध्यक्ष मधुकर शिंदे व नीलेश पानसरे यांनी दिली.

घाटाचे पूजन मावळचे माजी सभापती विठ्ठल शिंदे व माजी जि. प. सदस्य प्रशांत ढोरे यांच्या हस्ते तर बैलगाडा शर्यतीचा शुभारंभ सरपंच शशिकांत शिंदे व उपसरपंच स्वप्नील शेवकर यांच्या हस्ते आणि ग्रा. पं. सदस्य संदीप नाटक व बाळकृष्ण पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. तर बक्षीस समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप ढोरे, माजी उपसरपंच प्रशांत भागवत व अंकुश ढोरे तसेच बैलगाडा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब भेगडे यांच्या हस्ते पार पडला.

बैलगाडा शर्यतीतील अनुक्रमे एक ते सात विजयी बैलगाड्यांना अनुक्रमे १ लाख ११ हजार रुपये व मोटार सायकल, १ लाख रु. व मोटार सायकल, ८१ हजार रु. व मोटार सायकल, ७१ हजार रु. व मोटार सायकल, ६१ हजार रु. व फ्रीज, फ्रीज, एल.सी.डी. असे बक्षीसांचे वाटप करण्यात आले. तसेच घाटाचा राजासाठी मोटार सायकल बक्षीस दिले गेले.

शर्यतीचा निकाल -
प्रथम- कांचन मुऱ्हे व इतर १४, द्वितीय- प्रशांत भागवत, राजेश जवळेकर, महिपती लांडगे व इतर १५, तृतीय - विलास काळोखे व इतर ३०, चतुर्थ - विक्रम बोत्रे व इतर २१, पाचवा - अण्णासाहेब भेगडे व इतर १०, सहावा - प्रकाश भसे व इतर सात, सातवा - तात्यासाहेब शिंगाडे व इतर नऊ तसेच घाटाचा राजा - कांचन मुऱ्हे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT