पिंपरी-चिंचवड

डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इंदोरीतील नागरिक हैराण

CD

इंदोरी, ता. २३ ः इंद्रायणी काठच्या प्रत्येक गावातील सांडपाणी तसेच तळेगाव व टाकवे एमआयडीसीतील कारखान्यांचे रसायन मिश्रित दूषित पाणी थेट इंद्रायणी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे इंदोरी व परिसरात इंद्रायणीचे पाणी दूषित व दुर्गंधीयुक्त झाले आहे. परिणामी, जलपर्णीची वारेमाप वाढ झाली असून, नदीपात्र पूर्ण झाकून गेले आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे जलचरांचे जीवन व इंद्रायणी काठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने डासांचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

सांडपाणी व्यवस्थापन खर्च ग्रामपंचायतींच्या आवाक्या बाहेरचा असल्याने पीएमआरडीए व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ग्रामपंचायतींना सहकार्य करायला हवे. सध्या ग्रामपंचायतीकडून डासांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गाव, वाड्या-वस्त्यांवर फवारणी चालू असल्याचे ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी यांनी सांगितले.

जलपर्णीमुळे इंद्रायणीचे पाणी दूषित व दुर्गंधीयुक्त झाल्याने जनावरांसाठी वापर होत नाही. तसेच हातपाय धुणे, कपडे, भांडी धुण्यासाठीही वापर पूर्ण बंद झाल्याने गावोगावचे पाणवठे बेपत्ता झाले आहेत. इंदोरी हद्दीतील कुंडमळ्यापर्यंतचे इंद्रायणी पात्रच जलपर्णीने पूर्ण झाकून गेले आहे, असे विजय चव्हाण व अजय काशीद यांनी सांगितले.

दरम्यान, दररोज सायंकाळच्या सुमारास नदीकडून डासांचे लोट (थवे) गाववस्तीत प्रवेश करताना दिसतात. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने दररोज फवारणी करायला हवी, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक जयदत्त शिंदे व दशरथ उबाळे यांनी व्यक्त केली.

नदी पात्रात सोडलेले सांडपाणी, मैला तसेच रसायन मिश्रित पाणी याबाबत कुठल्याही प्रकारचे निर्बंध घातले जात
नाहीत. तोपर्यंत ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात ठिकठिकाणी आवश्यक तेवढे शोषखड्डे घ्यावेत, असे माजी सरपंच संदीप काशीद व माजी उपसरपंच प्रशांत भागवत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT