पिंपरी-चिंचवड

जांबवडे ग्रामपंचायतीकडून पाचशे देशी वृक्षरोपांचे वाटप

CD

इंदोरी, ता. ३ ः महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त जांबवडे (मावळ) ग्रामपंचायतीच्या वतीने ५०० देशी वृक्षरोपांचे सुमारे ५५ कुटुंबांना वाटप करण्यात आले. वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, आवळा, कडुनिंब इत्यादी देशी वृक्षरोपांचे लागवड व संगोपनासाठी वाटप करण्यात आले. सदर कुटुंबांनी घराच्या परिसरात अथवा शेताच्या बांधावर वृक्षारोपण करावे व संगोपन करावे, असे आवाहन सरपंच तानाजी नाटक यांनी ग्रामस्थांना केले. एक वर्षानंतर प्रत्यक्ष वृक्षारोपणस्थळी परिक्षण समिती येऊन पाहणी करील. आवश्यक त्या सूचना दिल्या जातील व पुन्हा तीन वर्षांनंतर परिक्षण करून स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाचे वाटप समारंभपूर्वक करण्यात येईल, असे उपसरपंच सागर नाटक यांनी स्पष्ट केले. वृक्षरोपांचे वाटप सरपंच, उपसरपंच, सदस्य पल्लवी नाटक, नंदा भोसले, पूनम नाटक व ज्येष्ठ ग्रामस्थ काशिनाथ भांगरे, सचिन नाटक, रोहिदास वाळूंज, अभिजित नाटक, सनी नाटक, मंगेश नाटक, दत्तात्रेय घोजगे यांच्या हस्ते करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Statement : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच, हसन मुश्रीफांनी ६ महिन्यापूर्वीच देवेंद्र फडणवीसांना दिली होती माहिती

Panchang 22 February 2026: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

Latest Marathi News Live Update : गोव्यासाठी आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस

Sharad Pawar Health : शरद पवार यांचा रक्ततपासणी, सिटीस्कॅन अहवाल आला, प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती; सुप्रिया सुळे उपस्थित

आधी संबंध ठेवले, नंतर प्रायव्हेट पार्टला आग लावली; लिव्ह इन पार्टनरचे १९ वर्षीय तरुणीसोबत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT