पिंपरी-चिंचवड

बससेवा गावातूनच पूर्ववत सुरू करण्याची मागणी

CD

इंदोरी, ता. ९ ः इंदोरी गावातून सुरू असलेली बससेवा पीएमपीएमएलने (तळेगाव-चाकण व तळेगाव-आळंदी)२१ जूनपासून बंद करून बाह्यवळण मार्गाने जात आहे. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कामगार व महिला प्रवासी यांची मोठी गैरसोय झाली असून, पुन्हा पूर्ववत गावातूनच बससेवा सुरू करावी, अशी मागणी इंदोरी ग्रामपंचायत व ग्रामस्थ करीत आहेत.

इंदोरी व परिसरातील सहा-सात गावांतील विद्यार्थी व कामगार मोठ्या संख्येने पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकणला दररोज ये-जा करत असतात. परंतु, आता बस गावाबाहेरून जात असल्याने मिळेल त्या खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. शिवाय वेळ व पैसा अधिक खर्च होत आहे., अशी प्रतिक्रिया मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप ढोरे यांनी व्यक्त केली.

इंदोरी गावातील बाजारपेठ रस्त्यांवर दुकानांपुढे लावली जाणारी बेशिस्त वाहने, दुकानदारांची गटारांवरील अतिक्रमणे (बांधकाम, जाहिरात फलक, पत्राशेड) वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून सतत वाहतूक कोंडी होते. सततच्या कोंडीमुळे बससेवा गावाबाहेरच्या बाह्यवळण रस्त्याने जात आहे. अतिक्रमणे व बेशिस्त वाहने याबाबत ग्रामपंचायतीने नोटिसा दिल्या असून, आठ दिवसात अतिक्रमणे न हटवल्यास कायदेशीर कारवाई होईल, असे सरपंच शशिकांत शिंदे व उपसरपंच संदीप नाटक यांनी सांगितले. तसेच वाहतूक कोंडी होणार नाही व बसचे वाहक, चालक यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशी हमी ही ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून पीएमपीएमएलला दिल्याचे सरपंच व उपसरपंच यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सरपंच शशिकांत शिंदे, उपसरपंच संदीप नाटक, माजी सभापती विठ्ठल शिंदे, माजी जि. प. सदस्य प्रशांत ढोरे, रमेश घोजगे, प्रशांत भागवत तसेच जगन्नाथ शेवकर, जयंत राऊत, महेश पानसरे यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून बससेवा गावातूनच सुरू करण्याची विनंती केली आहे. तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याचाही प्रयत्न सुरुच राहणार असल्याचे दिलीप ढोरे व संदीप काशीद यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT