पिंपरी-चिंचवड

इंदोरी परिसरात भात, भुईमूग जोमात पावसाने सोयाबीन काढणी लांबणीवर

CD

इंदोरी, ता. ३० ः यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने इंदोरी व परिसरात भात, सोयाबीन व भुईमूग पिके जोमात आहेत. त्यामुळे, शेतकरी वर्गात आनंदी वातावरण आहे. मात्र, अडीच महिन्याच्या वाणाची सोयाबीन काढणी लांबणीवर पडत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसानही होत आहे.
इंदोरीसह सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे, माळवाडी, कोटेश्वरवाडी, सांगुर्डी, कान्हेवाडी (तर्फे चाकण) या गावांमध्ये भात, सोयाबीन व भुईमूग ही प्रमुख खरिपाची पिके आहेत. सध्या भात पिकाच्या ओंब्या बाहेर पडत आहेत. भात भरणी तसेच सोयाबीनच्या साडेतीन महिन्यांच्या वाणाचे सोयाबीन पिकाच्या शेंगा व भुईमूग शेंगांच्या भरणीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. मात्र, अडीच महिन्याचे वाणाचे सोयाबीन पीक काढणीस आले आहे. पण, पावसामुळे काढणी लांबणीवर पडत असल्याने नुकसान होत आहे, असे शेतकरी सपना चव्हाण व श्रावण शिंदे यांनी सांगितले.
सध्या गळवा कांदा रोप टाकणी सुरू आहे. सुमारे १५-२० दिवसांपूर्वी टाकलेल्या रोपांना या पावसामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. आता ही कांदा रोपे सव्वा ते दीड महिन्यात लागवडीस येतील. तोपर्यंत सोयाबीन पीकाची काढणी उरकून त्या क्षेत्राची कांदा लागवडीसाठी मशागत होईल. यावर्षी कांद्याचे भाव टिकून असल्याने इंदोरी व परिसरात कांदा लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याचे शेतकरी दिनेश चव्हाण व संजय भेगडे यांनी सांगितले.

तुरळक क्षेत्रात भात पीक हे करपा रोगाने पिवळे पडले आहे. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे हे झाले आहे. त्यासाठी खताचा डोस व किटक नाशक फवारणी केल्यास उत्पादनात घट होणार नाही.
- गणेश दाभाडे, इंद्रायणी कृषी सेवा केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

Kerala Rain: केरळममध्ये पावसाचा हाहाकार; सहा जण वाहून गेले, पाच जणांचे मृतदेह सापडले

Pandharpur Murder: ५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; पंढरपुरातील खळबळजनक घटना; दीड महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

Rahul Bondre BJP Entry Cancelled : राहुल गांधींचा एक कॉल प्रोब्लेम सॉल्व! राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द; गांधींनी कॉलवर काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT