पिंपरी-चिंचवड

इंदोरीत भटक्या कुत्र्यांची दहशत नागरिकांत भीतीचे वातावरण

CD

इंदोरी, ता. २२ ः इंदोरी व परिसरातील गावांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकटे दुकटे घराबाहेर पडायला नागरिक घाबरत आहेत.
चाकण-तळेगाव रस्ता, नाणोली रस्ता, जांबवडे रस्ता, सांगुर्डी रस्ता येथे भटक्या कुत्र्यांच्या झुंडी अधिक आढळतात. गावाचा कचरा डेपो परिसर व रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या कचऱ्याचे ढीग हे त्यांची वास्तव्‍य व भटकण्याची प्रमुख ठिकाणे आहेत. त्यामुळे, परिसरातील रस्त्यांनी नित्यनेमाने फिरायला जाणाऱ्यांनी
फिरणे बंद केले आहे. तर पहाटे काकड आरतीसाठी वाड्या-वस्त्यांवरुन येणाऱ्यांची संख्या घटली आहे.
मागील आठवड्यात पानसरे वस्तीवरील प्रसाद पानसरे यांच्या गोठ्यात बांधलेल्या म्हशीचे पारड्यावर चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी हल्ला करुन त्याला जखमी केले. एक कानच तोडला. शाळेत जाणाऱ्या मुलांवर ही हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. पादचारी व महिला या कुत्र्यांच्या भीतीने एकटे न जाता सोबतीने जातात. बचावासाठी हातात काठी घेण्याच्या सूचना नागरिक एकमेकांना देत आहेत.

भंडारा डोंगराच्या पायथा परिसरात पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीत पकडलेली भटकी कुत्री गुपचूप आणून सोडली जातात. हीच कुत्री गटागटाने इंदोरी, जांबवडे, सुदवडी, सांगुर्डी, कान्हेवाडी गावांत जाऊन दहशत निर्माण करत आहेत. त्यांचा बंदोबस्त कसा करावा ? असा गंभीर प्रश्न प्रत्येक ग्रामपंचायतीपुढे निर्माण झाला आहे. - बाळकृष्ण पानसरे, माजी उपसरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT