इंदोरी, ता. २५ ः संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र भंडारा
डोंगर पायथ्याशी ९ ते १७ मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र संत तुकाराम महाराज संस्थान देहू, श्री विठ्ठल रखुमाई भंडारा डोंगर संस्थान, श्रीक्षेत्र घोरवडेश्वर डोंगर व श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर वारकरी सेवा मंडळ यांच्या सहकार्याने होणार आहे. दररोज सकाळी अकरा ते साडेबारा आणि सायंकाळी सहा ते आठ या वेळात कीर्तन होणार आहेत. नऊ मार्चपासून अनुक्रमे रवींद्र महाराज ढोरे, मुकुंदकाका जाटदेवळेकर, सागर महाराज शिर्के, पोपट महाराज कासारखेडेकर, दशरथ महाराज मानकर, एकनाथ महाराज सदगीर, पुरुषोत्तम महाराज मोरे व चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चंद्रकांत महाराज वांजळे, महादेव महाराज राऊत, नितीन महाराज काकडे, बंडातात्या कराडकर, चैतन्य महाराज देगलूरकर, रामभाऊ महाराज राऊत, ज्ञानेश्वर माऊली कदम, जयवंत महाराज बोधले यांची कीर्तने होतील. १७ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
लक्षवेधी दिंडी सोहळा
आठ मार्च रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत श्रीक्षेत्र देहू ते भंडारा डोंगर असा दिंडी सोहळा होणार असून, त्यामध्ये ३७५ धर्मध्वजधारी,
३७५ कलशधारी, ३७५ तुळशीधारी, ३७५ कीर्तनकार, ३७५ टाळकरी, ३७५ मृदंगसेवक, ३७५ ब्रम्हविणाधारी व ३७५ चोपदार असणार आहेत. सायंकाळी सहा ते आठ मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या कीर्तनाने सप्ताहाला प्रारंभ होईल
सोहळ्यातील वैशिष्ट्ये
- मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूर, भोर, वेल्हा व पुरंदर हे तालुके आणि पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे महापालिका
यांचा आयोजनात सहभाग
- पाच हजार गाथा वाचक, एक हजार टाळकरी, पंचवीस मृदंग वादक, अखंड तुकाराम भजन
- शांतीब्रम्ह मारोती महाराज कुऱ्हेकर आणि डॉ. नारायण महाराज जाधव हे स्वागताध्यक्ष असणार
- तुकाराम बीजेच्या दिवशी दुपारी दोन वाजता वैकुंठगमन स्थान श्रीक्षेत्र देहू, भंडारा डोंगर, घोरावडेश्वर व भामचंद्र डोंगरांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणार
- प्रत्येक गावातून भाकरी आणि आमटी मागविण्यात येणार
- होळीच्या दिवशी मुळशी तालुक्यातून पाच लाख पुरणाच्या पोळ्यांचे नियोजन
आतापर्यंत मराठवाडा, कोकण, विदर्भ, खानदेशमधील भाविक देहूत येऊन गाथा पारायण सोहळे करतात. मात्र, यंदाचे ३७५ वर्ष असल्याने
पुणे जिल्हा या सोहळ्यासाठी एकत्र आला आहे. भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराज यांनी अभंगरचना केल्या. यानिमित्ताने काव्य स्पंदने भाविकांना अनुभवता येणार आहेत, त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा.
- ज्ञानेश्वर महाराज कदम, ज्येष्ठ कीर्तनकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.