पिंपरी-चिंचवड

इंदोरीत शंभर देशी झाडांचे वृक्षारोपण

CD

इंदोरी, ता. ४ ः महसूल सप्ताह कार्यक्रमांतर्गत इंदोरी-सांगुर्डी रस्त्यावर कान्हेवाडी फाटा ते सांगुर्डी शिवपर्यंत दुतर्फा शंभर देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. वड, पिंपळ, कडूलिंब, करंज, बदाम व शमी या देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. संगोपनाची जबाबदारी इंदोरी ग्रामपंचायतीने घेतली आहे.
इंदोरी ग्रामस्थ, तोलानी शिक्षण संस्था, कॅडबरी इंडिया कंपनी व साई रोझ नर्सरी यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार अमोल पाटील, मंडल अधिकारी लिंबराज सलगर, माजी सभापती विठ्ठल शिंदे, माजी जि. प. सदस्य प्रशांत ढोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी सरपंच शशिकांत शिंदे, उपसरपंच बेबीताई बैकर, सर्व ग्रा. पं. सदस्य, उद्योजक प्रशांत भागवत, दिलीप ढोरे, जगन्नाथ शेवकर, कॅडबरी कामगार नेते विनोद भागवत आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक संदीप काशिद यांनी केले. सूत्रसंचालन संदीप नाटक व दिनेश चव्हाण यांनी केले. नियोजन अरुण हुलगे, नीलेश शिंदे यांनी केले. आभार महसूल अधिकारी सचिन जाधव यांनी मानले.
---
PNE25V37134

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT