इंदोरी, ता. १९ : प्रगती विद्यालय व आ. ना. काशिद पा. उच्च माध्यमिक विद्यालयाने तंबाखूमुक्त शाळा अभियानात
सहभाग घेतला. याबद्दल शासनाकडून प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. प्राचार्य महादेव ढाकणे व पर्यवेक्षक काकासाहेब भोरे यांचे मार्गदर्शनाखाली गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यात आली. ‘तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम’ विषयावर मंगल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले; तर लक्ष्मण मखर यांनी मार्गदर्शन केले. यानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच विद्यालय परिसरातील दुकानदारांना तंबाखूजन्य पदार्थ न ठेवण्याचे आवाहनपत्र शाळेकडून देण्यात आले.
सरपंच शशिकांत शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी अरुण हुलगे यांनी या उपक्रमाबद्दल विद्यालयाची प्रशंसा केली. अभियानाचे नियोजन अमोल जाधव, अरविंद नाईकरे, संतोष कदम, प्रदीप ढोंगे, रुपेश शिंदे, प्रवीण राऊत यांनी केले.
PNE25V41164