पिंपरी-चिंचवड

इंदोरीकर तीन दिवस भक्तीमेळ्यांचा आनंद लुटणार

CD

इंदोरी, ता. ११ ः कार्तिकी एकादशी व संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दरवर्षी श्री क्षेत्र आळंदीस मुंबई व कोकणातून शेकडो पायी दिंड्या जातात. या दिंड्या एकादशीच्या आधी तीन दिवस ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने मावळातील मुंबई पुणे महामार्ग व तळेगाव चाकण मार्गाने जातात. शनिवारी (ता. १५) एकादशी ते सोमवार (ता. १७) संत माऊली संजीवन समाधी
सोहळ्यापर्यंत लाखो वारकरी आळंदीत असतात.
मंगळवार पासून पायी दिंड्या मजल दर मजल करीत इंदोरी मार्गे आळंदीकडे मार्गस्थ होत आहेत.
अनेक दिंड्या दुपारी विश्रांतीसाठी तर रात्री मुक्कामी थांबतात. त्यामुळे ग्रामस्थांना वारकऱ्यांच्या सेवेसोबतच हरिनामाचा गजर, कीर्तन, प्रवचनाचाही लाभ मिळतो.
बुधवारी (ता. १२ ) सायंकाळी पाच वाजता संत सेवा मंडळ कुळगाव बदलापूर परिसर दिंडीचे स्वागत प्रगती विद्यालयाच्या क्रीडांगणावर होत असून रात्री आठ ते दहा या वेळेत निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे. तर माजी सरपंच मधुकर ढोरे यांच्या निवासस्थानी श्री क्षेत्र पटणोली दिंडीचे सायंकाळी पाच वाजता स्वागत आणि दीपक महाराज गांगर्डे (श्रीगोंदा) यांची कीर्तन सेवा होणार आहे. तसेच प्रशांत भागवत युवा मंचच्या वतीने भागवत पेट्रोलपंपाच्या शेजारी समाधान महाराज भोगेकर यांच्या कीर्तन सेवेचे आयोजन केले आहे.
गुरुवारी (ता.१३) सकाळी दहा वाजता भंडारा डोंगर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्या निवासस्थानी कोकण दिंडीचे स्वागत आणि प्रा. गणेश महाराज भगत यांची कीर्तनसेवा होणार आहे. तर शैलेश भसे यांच्या विठ्ठल कामत रेस्टॉरंट प्रांगणात सायंकाळी पाच वाजता श्री शाबरी माता कातकरी आदिवासी खालापूर परिसर दिंडीचे आगमन होत असून रात्री आठ ते दहा मधुकर महाराज टबाले (पिकवाडा) यांची कीर्तनसेवा होत आहे. तसेच दुपारी ग्रामस्थांचे वतीने भुईकोट किल्ल्यातील कडजाई माता मंदिर प्रांगणात मावळ दिंडीचे स्वागत होणार असून कीर्तनाचे आयोजन
केले आहे. तर शिवशक्ती मित्र मंडळ व महाविष्णू मित्र मंडळाच्या वतीने शिवशक्ती चौकात माणगाव वासरे दिंडीचे स्वागत आणि विष्णू महाराज तुरडे यांचे प्रवचन होणार आहे. सर्व आयोजकांकडून वारकरी व उपस्थितांना महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. तसेच गावातील ज्योतिबा मंदिर, इंद्रेश्वर मंदिर, राम मंदिर, सावता महाराज मंदिर, हनुमान मंदिर, संत तुकाराम पादुका मंदिर येथे ही बुधवार ते शुक्रवार पर्यंत दिंड्या मुक्कामी असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकल वाहतुकीला मिळणार ‘ग्रीन कॉरिडॉर’! 'या' मार्गादरम्यानचे १० रेल्वे फाटक होणार बंद

Ajit Pawar: रुपाली ठोंबरे यांना दोन्ही शिवसेनेची ऑफर; उद्या घेणार अजित पवारांची भेट, म्हणाल्या...

'शोनु, बेबी नाही तर... रेश्मा शिंदेचा दाक्षिणात्य पती घरी तिला 'या' नावाने मारतो हाक; म्हणते- तो साऊथ इंडियन टचमध्ये...

Latest Marathi Breaking News : दिल्ली बॉम्बस्फोटानंतर शिर्डीमध्ये हायअलर्ट

Pimpalner Election : पिंपळनेर नगर परिषदेची पहिली निवडणूक ऐतिहासिक! भाजप-शिवसेनेत फूट पडल्याने महायुती 'स्वबळावर' लढणार?

SCROLL FOR NEXT