इंदोरी, ता.२४ ः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणूक संदर्भात पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
मतदारांनी मतदानाचा हक्क चोखपणे बजावावा यासाठी इंदोरीतील प्रगती विद्यालय व आ. ना. काशीद पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावात मतदान जागृती प्रभात फेरीचे आयोजन केले होते.
मतदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच त्यांना मतदानासाठी प्रेरित करणे या उद्देशाने जागृती प्रभात फेरीचे आयोजन
केले आहे. अशी प्रतिक्रिया प्राचार्य महादेव ढाकणे यांनी व्यक्त केली.
या फेरीत सहावी ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘मतदान करा देश घडवा’,‘एक मत एक राष्ट्र’,‘अनमोल मत विकू नका’ अशा घोषणांनी प्रबोधन केले. विद्यार्थ्यांसमवेत पर्यवेक्षक काकासाहेब भोरे, संतोष कदम, अरविंद नाईकरे, मोहिनी ढोरे, नयना पारिठे, अश्विनी भापकर, रेश्मा इनामदार, प्रवीण राऊत, सुमीत दहितुले सहभागी झाले होते.
PNE26V89296
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.