इंदोरी, ता. २४ ः रघुवीर तुकाराम खेडकर यांना शासनाने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. त्याबद्दल इंदोरी ग्रामस्थ व ग्रामपंचायतचे वतीने सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
इंदोरी गावचे राष्ट्रपती पदक विजेते दादू इंदोरीकर व खेडकर यांचे वडील तमाशा सम्राट कै. तुकाराम खेडकर यांच्यातील मैत्रीमुळे खेडकर व इंदोरी ग्रामस्थांनी आपुलकीचे नात्यातून हा सत्कार केला. मावळचे माजी सभापती विठ्ठल शिंदे, माजी जि.प. सदस्य प्रशांत ढोरे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित मावळ पं. स. सदस्य दिलीप ढोरे होते. खेडकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्य व प्रेमाबाबत आभार मानले. तसेच संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. खेडकर व सरपंच शशिकांत शिंदे यांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी दामोदर शिंदे, बबनराव ढोरे, संदीप काशिद, जगन्नाथ शेवकर, आशिष ढोरे उपस्थित होते. अरुण हुलगे, दाऊद तांबोळी, विजय हिंगे व अनिकेत सोनवणे यांनी नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.