इंदोरी, ता. २७ : मावळ पंचायत समिती सदस्यपदी दिलीप ढोरे यांची निवड झाली असून, गटनेते म्हणूनही त्यांची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर इंदोरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी इंदोरी-वराळे गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या पल्लवी दाभाडे यांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे व उपसभापती नामदेव शेलार यांच्या हस्ते, तर संस्थेचे चेअरमन विठ्ठल ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी संस्थेचे संचालक आबासाहेब काशिद, श्रावण शिंदे, मनोहर काशिद, अशोक मराठे, सुलोचना काळे, दीपक शेवकर, निवृत्ती हिंगे, अरुणा भेगडे, जगन्नाथ शेवकर, मल्हारराव शिंदे, प्रवीण भापकर, पोपटराव खुडे तसेच बळिराम मराठे, सचिन काळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत मल्हारराव शिंदे यांनी केले. गुलाब ढोरे, लक्ष्मण गाडे व बाबूराव गरुड यांनी संयोजन केले, तर आभार मनोहर काशीद यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.