जाधववाडी, ता. ४ : कुदळवाडी आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची गरज जास्त असते. पण, ऐन याच काळात अपुरे पाणी मिळत आहे. सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने महिलांची तारांबळ उडत आहे. तसेच कामावर जाणाऱ्यांनाही जाण्यास उशीर होतो. पाणी नसल्याने सण-उत्सव साजरे करण्याला मर्यादा येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक मोठ्या गृहप्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. पण, नागरी वस्त्यांना पाणी पुरत नसल्याची तक्रार केली जात आहे. वाहनांच्या वॉशिंग सेंटरला मुबलक पाणी दिले जाते. मात्र रहिवाशांना पाण्यासाठी पैसे खर्च करावे लागत आहे. निवेदन देऊन आणि मागणी करूनही पाणी समस्या सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची प्रतिक्रिया नागरिक नोंदवत आहेत.
कुदळवाडी परिसरात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक कुटुंबांना पाणी वेळेत मिळत नाही. त्यावर लवकर तोडगा काढावा, अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढू. प्रशासनाने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये.
- दिनेश यादव, माजी स्वीकृत सदस्य, महापालिका
कुदळवाडी परिसराला पुरेसे पाणी पुरवण्यासाठी प्रशासनातर्फे वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या भागातील पाणी प्रश्न लवकरच सोडवला जाईल.
- शेखर गुरव, उपअभियंता, पाणीपुरवठा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.