पिंपरी-चिंचवड

संतांनी दाखविलेला मार्ग आजही दिशादर्शक

CD

जाधववाडी, ता. ३० : ‘‘अन्याय, अनीती, अधर्म, अनाचार यांवर मात करण्याची प्रेरणा संतसाहित्यातून आपल्याला मिळते. आपल्या मनात साठलेली अविवेकाची काजळी दूर केल्यास समाज विवेकशील बनतो. विवेकशील समाजालाच सुदृढ समाज म्हटले पाहिजे. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव आदी संतांनी उत्तम जगण्याचा मार्ग दाखविला, तो आजच्या काळातही दिशादर्शक आहे. संतांनी समाजाला विवेकवाद शिकवला,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले.
चिंचवडच्या संभाजीनगर येथील श्री दत्त मंदिरामध्ये गुरूदत्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ते बोलत होते. श्री ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील
‘‘मी अविवेकाची काजळी।
फेडोनी विवेकदीप उजळी ।।
ते योगिया पाहे दिवाळी।
निरंतर॥
या ओवीची मध्यवर्ती कल्पना घेऊन घावटे यांनी प्रवचन केले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्यामकांत मोरे, दिलीप सावंत, अभिमन्यू भारसाकडे, दीपक पालांडे, आनंद देसाई, तुकाराम घारे, मुरलीधर वाघ, विजय जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
घावटे म्हणाले, ‘‘बदलत्या काळाची आव्हाने ओळखून आचार आणि विचारशील पिढ्या निर्माण झाल्या पाहिजेत. त्यासाठी भागवत धर्माच्या मार्गाने जावे लागेल. ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील प्रत्येक ओवी जगण्याची प्रेरणा देते. लालित्यपूर्ण, कोमल, सात्विक आणि रसाळ भाषेचा आविष्कार आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दिसून येतो. प्रत्येक ओवीचा भावार्थ समजावून घेणे आणि त्यातून बोध घेणे ही अव्याहत प्रक्रिया आहे. संतांच्या विचारांचा जागर पिढ्यानपिढ्या सुरू आहे. तो यापुढेही सुरू ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. समाजाच्या जडणघडणीसाठी ते आवश्यक आहे. केवळ मंदिरे निर्माण करण्यापेक्षा संतसाहित्यातून समाजाचे प्रबोधन घडवून आणणारी समाजमंदिरे निर्माण होणे गरजेचे आहे.’’
अभिमन्यू भारसाकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

Latest Marathi News Live Update : नंदूरबारमध्ये जखमी अवस्थेत सापडले बिबट्याचे बछडे; वनविभागाकडून उपचार सुरू

Middle East War: पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजीनंतर आता सीएनजीची टंचाई! ऑटो-रिक्षा भाडे वाढले; नवे दर किती?

मुस्लिम हिंदूंपेक्षा चांगला कसा? मुमताज यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया; म्हणाल्या- एकीला सोडून दुसरीशी लग्न...

SCROLL FOR NEXT