जाधववाडी, ता.१६ ः इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत परीक्षेत जाधववाडी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिका साई जीवन प्राथमिक कन्या शाळेच्या अनुष्का भोरे, सुप्रिया गोल्हार आणि शुभ्रा ढाणे या तीन विद्यार्थिनी जिल्हा गुणवत्ता यादीत येऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या. त्यांना ३ वर्षांसाठी अनुक्रमे ५ हजार व ७५०० रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या विद्यार्थिनींना इयत्ता ४ थीसाठी संदीप वाघमोरे तर इयत्ता ७ वीसाठी आबासाहेब पाळवदे आणि दिनेश पाखरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपायुक्त ममता शिंदे, शिक्षणाधिकारी संगीता बांगर, मुख्याध्यापिका मृगनयना चव्हाण, पर्यवेक्षिका प्रमिला जाधव आदींनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.