पिंपरी-चिंचवड

अवकाळी पावसाचा पिकांना फटका

CD

कामशेत, ता. १५ : कामशेत व नाणे मावळमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. रखरखत्या उन्हात सर्वसामान्य नागरिकांना जरी या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी शेतकरी मात्र अक्षरशः हवालदिल झाला आहे. बाजरी, ज्वारी, आंबा, कलिंगड, गहू, कांदा, अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मावळ तालुक्यात शनिवारपासून वादळी पाऊस झाला. मागील तीन-चार वर्षांत दुष्काळाचे सावट काहीसे कमी झाले असले तरीही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे. खरे तर हा काळ रब्बी पिकाचा होता. मात्र, पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. सलग दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. आंब्यातही पावसामुळे कीड तयार झाली आहे.
नाणे मावळात पावसामुळे बाजरी, काकडी, कांदा, भाजीपालासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात व मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. रात्री अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
कामशेत भागात पावसामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी संकटामुळे आणखी संकट वाढले आहे. दुसरीकडे ‘महावितरण’कडून वीज बिल भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी लाइट बिल कसे भरावे, असा प्रश्न उपस्थित करीत आता प्रशासनाने तातडीने पंचनामे करून ठोस मदत द्यावी, अशी मागणी नाणे मावळातील शेतकरी करीत आहे.


अवकाळी पावसामुळे ज्वारी आणि बाजरी भिजून आमचे हजारोंचे नुकसान झाले आहे.
- हनुमंत चोपडे, कोंडिवडे नामा

अचानक येणाऱ्या अवकाळीमुळे आमच्या शेतामध्ये गुरांसाठी ठेवलेला चारा हा भिजून खराब झाला. त्यामुळे गुरांच्या चाऱ्याची सोय आता कशी करावी या चिंतेत आम्ही आहोत.
नीतेश कडू, बोरज


पावसामुळे शेतातील पिके वाऱ्याच्या खाली पडली आहेत. बाजरीच्या गोंड्यांना बुरशी लागली आहे. त्यामुळे नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
- विलास गायकवाड, कांब्रे

वादळी वाऱ्यासहित आलेल्या पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे आंबे शेतामध्ये सर्वत्र पडले आहेत. त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले.
- संतोष गायकवाड, कोंडिवडे नामा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT