पिंपरी-चिंचवड

राज्यस्तरीय एक दिवसीय उन्हाळी शिबिरास मोठा प्रतिसाद

CD

पिंपरी, ता. १० : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे पीठाधीश प्रमुख गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने व बालसंस्कार विभागाचे प्रमुख नितीन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड पुणे केंद्रात राज्यस्तरीय एक दिवसीय उन्हाळी शिबिर झाले. रावेत, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिखली, मोशी या भागातील बालकांनी शिबिरामध्ये सहभाग घेतला. शिबिराच्या माध्यमातून हजारो मुलांसाठी उपयुक्त माहितीसह, प्रात्यक्षिक स्टॉल, मनोरंजन, विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना आदर्श दिनचर्या कशी असावी, व्यायामाचे महत्त्व, सूर्यनमस्कार, आहार-आरोग्य, स्तोत्र मंत्राचे वैद्य ज्ञानिक महत्त्व, जीवनात आई- वडील गुरूंचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. पालकवर्गास मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक विकास कसा करावा. याबाबत व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तज्ज्ञ प्रतिनिधींद्वारे मुलांच्या विविध समस्या, प्रश्न यावर समुपदेशन करण्यात आले. गुरुमाऊली संकल्पित एक कोटी महावृक्षारोपण अभियान अंतर्गत मुलांकडून सिडबॉल बनवून घेण्यात आले. शिबिरात सहभागी मुलांना स्वसंरक्षण तंत्राचे महत्त्व सांगण्यात येऊन त्यांना लाठीकाठी प्रशिक्षण देण्यात आले. राज्यात १४६० ठिकाणी झालेल्या या शिबिरात विभाग प्रतिनिधी पालक व शिक्षकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपा आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं काय घडलं?

Ambulance Policy: रुग्णांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रात नवे अ‍ॅम्ब्युलन्स धोरण लागू; ४ अ‍ॅप्सशी जोडणार, जाणून घ्या नवी प्रणाली

100 मुलांचा बाप! रशियाकडून दहशतवादाला मदत केल्याचा आरोप; आजही 15 कोटी भारतीय वापरतात त्याचे अॅप, नेमकं प्रकरण काय?

Amit Shaha : अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान २३० काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड; पोलिसांवर अधिकार उल्लंघनाचा आरोप

Latest Marathi News Live Update : पुण्यात पॉवर सब-स्टेशन प्रकल्पाच्या कार्यालयाची अज्ज्ञातांकडून तोडफोड

SCROLL FOR NEXT