पिंपरी-चिंचवड

माळवाडीजवळील रस्त्याची दुरवस्था, चालकांची कसरत

CD

पिंपरी, ता. १४ ः अलीकडे डांबरीकरण करण्यात आलेल्या माळवाडी ते बेगडेवाडी दरम्यानच्या उर्वरित रस्त्याचेही डांबरीकरण करावे,
अशी मागणी माळवाडी, कोटेश्वरवाडी, शेलारवाडीतील नागरिकांनी केली आहे. या रस्त्यावरून वाहनचालकांना कसरत करावी लागते.
माळवाडी ते बेगडेवाडी या रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. त्यामुळे वाहन चालकांची चांगली सोय झाली आहे. मात्र डेपोजवळील गणपती मंदिर ते चाकण मार्गावरील माळवाडी या एक किलोमीटर दरम्यान डांबरीकरण करण्यात आलेले नाही. या रस्त्याची दुरवस्था असून, तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी देहूरोड कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष अशोक शेलार यांनी केली आहे.
अशोक शेलार म्हणाले, ‘‘याबाबत आमदार सुनील शेळके यांच्याशी बोलणे झाले आहे. आमदार फंडातून रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले तर ते अडवले जाऊ नये असे त्यांनी स्पष्ट केले.’’
सरपंच पल्लवी दाभाडे, उपसरपंच दीपक दाभाडे म्हणाले, ‘‘जानेवारीमध्ये डेपो प्रशासनाची भेट घेऊन माळवाडी ते डेपोपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण आमदार फंडातून करण्याची परवानगी मागितली होती. मात्र तेव्हा परवानगी न मिळाल्याने रस्त्याची मुरूम टाकून दुरुस्ती केली होती.’’

फोटोः 02362

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! या 10 मागण्या मान्य झाल्यास पगारात आणि पेन्शनमध्ये होणार बंपर वाढ

भररस्त्यात वाघाला घेरलं, नंतर जवळ जाऊन...; ताडोबातील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल

काळजाला भिडणारी घटना! ज्या वडिलांनी हात धरून चालायला शिकवलं, त्यांनाच पोत्यात भरून पार्सल करण्याचा मुलीचा प्रयत्न; पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Pune Zp Election : पुणे जिल्हा परिषदेत आंबेगावला पुन्हा मान; वळसे पाटील कुटुंबाची परंपरा कायम, उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा विवेक वळसे पाटील

SCROLL FOR NEXT