पिंपरी-चिंचवड

किवळेमधील मुकाई चौकातील कोंडी कायम

CD

किवळे, ता. १ : मुकाई चौकातील वाहतूक कोंडीची समस्या कायम असून चौकासह बापदेव महाराज पुलाच्या दुतर्फा सार्वजनिक ठिकाणी लावल्या जाणाऱ्या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होत आहे. मात्र, त्यावर उपाययोजना करण्याकडे महापालिकेच्या बीआरटीएस विभागाची चालढकल सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे, या चौकातील कोंडीचा स्थानिक आणि बाहेरच्या नागरिकांना दररोजच दिवसभर सामना करावा लागत आहे.
किवळे येथील मुकाई चौकात देहूरोड, विकासनगर, रावेत, सांगवडे, मामुर्डी, निगडी बाजूकडून येणाऱ्या वाहने एकत्रित येतात. त्यामुळे, या चौकात वाहतूक कोंडी नित्याची समस्या होऊन बसली आहे. रावेत-प्राधिकरणास जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आल्यानंतर तर मुकाई चौकात सकाळपासून संध्याकाळ पर्यंत रोजच वाहतुकीची कोंडी होत आहे.

सध्याचे उपाय...
- चौकात चारही बाजूने येणाऱ्या अवजड वाहतुकीस बंदी.
- वाहतूक कर्मचारी संख्येत वाढ.
- पालिकेकडे जादा ट्रॅफिक वॉर्डनची मागणी.

बीआरटीएस विभागाचे नियोजन
किवळे, गहुंजे, मामुर्डी, देहूरोड आणि पुणे-मुंबई द्रुतगतीकडे जाणारी वाहतूक बापदेव महाराज पुलाच्या अलीकडे रावेत पुलाखालून परत उजव्या बाजूने पुढे वळविण्याचे पालिकेच्या बीआरटीएस विभागाचे नियोजन आहे. मात्र, अंमलबजावणीबाबत विभागाची अजून चालढकल सुरू आहे.

वाहनांचा दुतर्फा अडथळा
मुकाई चौक, बापदेव महाराज पुलाच्या दुतर्फा सार्वजनिक ठिकाणी लावल्या जाणाऱ्या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होत असून त्याने कोंडीत अजूनच भर पडत आहे. वाहतूक वळविणे असेल किंवा अन्य उपाययोजना तातडीने करण्यासाठी पालिका बीआरटीएस विभागास सद्बुद्धी मिळो, अशी उपरोधिक टीका सजग नागरिकांकडून केली जात आहे.

मुकाई चौक परिसरातील बहुतेक जागा ताब्यात घेतल्या आहेत. रुंदीकरण पूर्व कार्यवाही म्हणून नगररचना विभाग व पालिकेच्या अन्य विभागांना पत्रव्यवहार केला आहे. मुकाई चौकात किवळे बस टर्मिनलच्या दुतर्फाही साठ फुटी रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. सध्या ४५ फुटांपेक्षा जास्त रस्ता वहिवाटीत आहे. हा रस्ता साठ फूट रुंद करण्यासाठी उर्वरित जाग्या ताब्यात घ्यायची आहे. ही सर्व कार्यवाही पुढील काही महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतरच वाहतूक रावेत मार्गे वळविण्यात येईल आणि त्यानंतरच मुकाई चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊ शकेल.
- बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता, बीआरटीएस विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT