देहूरोड, ता.१८ : तेजग्यान ग्लोबल फाउंडेशनमार्फत सरश्री निर्मित संपूर्ण लक्ष शिबिराचे उद्या रविवारी (ता.१९) आणि २३ जानेवारीला आयोजन करण्यात आले आहे. फाउंडेशनच्या चिंचवड, निगडी, भोसरी, सांगवी, जगताप डेअरी, औंध, चाकण, कोयनानगर ,थेरगाव, भोसरी एमआयडीसी, आळंदी, राजगुरुनगर केंद्रांवर सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हे शिबिर होणार आहे.
या शिबिरांत भयमुक्त आणि तणावपूर्ण जीवन कसे जगावे ?, चुकीच्या सवयी आणि वृत्तींपासून मुक्त कसे व्हावे ?, साधे, सरळ, शक्तिशाली आणि समृद्ध जीवन तसेच मधुर नातेसंबंध कसे निर्माण करावेत यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. महाआसमानी परम ज्ञान शिबिर तयारीसाठी तीन तास संपूर्ण लक्ष शिबिर, पूर्ण दिवस मूलभूत सत्य शिबिर, पूर्ण दिवसीय ब्राईट रिस्पॉन्सबिलिटी शिबिर होणार आहे. तीन दिवसीय महाआसमानी परम ज्ञान शिबिरात आठवड्यात एक दिवस दोन तासांची चार श्रवण सत्रे होणार आहेत. या शिबिरात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पातळीवरील संबंधित केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.