किवळे, ता. १ : आकुर्डी भागातील क्रांतीनगर येथे मंगळवारी सकाळपासून फ्युज गेल्याच्या कारणामुळे दिवसभर वीजपुरवठा खंडित झाला. अचानक वीज पूरवठा गायब झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
याबाबत महावितरणच्या चिंचवड कार्यालयातील महिला अधिकाऱ्यास संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन दुसऱ्याच कर्मचाऱ्याने उचलला आणि त्यांनी समाधानकारक माहिती दिली नाही, अशी माहिती आयटी अभियंता रोहण सोनवणे, वैभवी सोनवणे, लक्ष्मी गभाले आणि मारुती गभाले यांनी दिली. वीजपुरवठा बंद असल्यामुळे कूपनलिकेचे पाणी छतावरील टाकीत पोहोचू शकले नाही. परिणामी घरगुती वापराच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली.
आमच्या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. ही समस्या कायमची सोडवावी आणि चिंचवड सहायक अभियंत्यांना याबाबत समज द्यावी, अशी मागणी महावितरणच्या भोसरी कार्यालयाकडे केली आहे.
््― रोहण सोनवणे, स्थानिक नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.