पिंपरी-चिंचवड

मुकाई चौकामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती, रुग्णवाहिकाही अडकली

CD

किवळे, ता. १३ : मुकाई चौक परिसरात रविवारी रात्री वाहतूक पोलिस अनुपस्थित असल्याने चारही दिशांनी आलेल्या वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. एका तासापेक्षा जास्तवेळ ही परिस्थिती राहिल्याने स्थानिक रहिवासी व द्रुतगती मार्गावर जाणारी वाहने दोन्ही अडकून पडले. याच काळात एक रुग्णवाहिकाही अडकली होती. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
रावेतकडून आलेल्या काही वाहनांनी शॉर्टकट म्हणून कोहिनूर इमारतीच्या पार्किंगमार्गे बापदेव पुलाकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या दिशेने कोंडी आणखी वाढली. शिवाय काही वाहनचालकांनी रस्ता न सोडल्याने परिस्थिती पूर्णतः हाताबाहेर गेली.
वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही यंत्रणा उपस्थित नसल्याने नागरिक व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. किवळे व देहूरोड परिसरात सायंकाळी वर्दळ वाढते. त्यामुळे अशावेळी वाहतूक पोलिसांची उपस्थिती अत्यावश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


फोटोः 04744

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT