पिंपरी-चिंचवड

‘आयटी’ सोडून तरुणाची दुग्ध व्यवसायात वाटचाल

CD

संदीप भेगडे ः सकाळ वृत्तसेवा
किवळे, ता.३ : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) पदवी मिळविल्यानंतर बहुतांश तरुण शहरातील आयटी क्षेत्रात करिअर करतात. मात्र, पुनावळे येथील नवनाथ कुदळे यांनी वेगळा मार्ग स्वीकारत दुग्ध व्यवसायात आत्मविश्वासाने यशस्वी वाटचाल केली आहे.
काही काळ बाणेर येथे आयटी कंपनीत कुदळे यांनी नोकरी केली. मात्र, नोकरीत मानसिक समाधान न मिळाल्याने त्यांनी आपल्या पिढीजात व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. शेती आणि दुग्ध व्यवसायात करिअर करण्याचा निर्णय त्यांनी आत्मविश्वासाने घेतला. पिशवीतील दुधाऐवजी कुदळे यांच्याकडील ताजे, नैसर्गिक दूध ग्राहक अधिक पसंत करत आहेत. ते स्वतः दुचाकीवरून पुनावळे आणि आसपासच्या परिसरात दूध पुरवतात. त्यांना म्हशीच्या दुधाचा दर ८५ ते ९० रुपये प्रति लिटर मिळत आहे.
गाई व म्हशींसाठी ऊस कुट्टी, कडबा, तूर भुस्सा यासारखा चारा दिला जातो. डेअरी फार्ममधील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू जवणे व डॉ. विवेक फाळके यांचे नियमित मार्गदर्शन मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कृत्रिम रेतन पद्धतीने देशी गायींच्या वंशवाढीसाठी ते कार्यरत असून यामुळे ९० टक्के मादी जातीच्या वासरांचा जन्म होत आहे. कुदळे यांचा सध्याचा महिना खर्च अंदाजे १ लाख रुपये असून नफा ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत मिळतो. त्यांच्या यशामागे आजोबा शांताराम कुदळे व वडील माऊली कुदळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे, असे त्यांनी नमूद केले.

मुऱ्हा म्हशी, संकरित गाई
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील पुनावळे गावात कुदळे कुटुंबाची शेती असून त्यामध्ये त्यांनी स्वतःचा गोठा उभारला आहे. सध्या त्यांच्याकडे मुऱ्हा जातीच्या ५ म्हशी, गीर व साहिवाल अशा ४ देशी संकरित गाई असून दररोज सरासरी दूध उत्पादन ६० लिटर आहे. गायींचे दूध ९ ते १० लिटरपर्यंत जात आहे.


वाकड येथून २०१८ मध्ये मी बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स) पूर्ण केले. पुढे एमएस्सीसुद्धा केले. तरीही शेती व दुग्ध व्यवसायाकडे वळलो. या व्यवसायात मी समाधानी आहे.
- नवनाथ कुदळे, दुग्ध व्यावसायिक, पुनावळे
KIW25B04815

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; राज्यात पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रवाशांची होणार कोंडी! रेल्वेनंतर वाहतूक विभागाचा ब्लॉक; खड्डे समस्यांसाठी 'या' मार्गावर ३ दिवस प्रवेश बंद

Elephant Relocation Controversy : कोल्हापूर झालं आता गडचिरोलीचा नंबर? 'माधुरी'नंतर कमलापूर कॅम्पमधील हत्तींबाबत चिंतेचं वातावरण...

ENG vs IND: 'वॉन आणि माझ्यात ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याच्या बातम्या निराधार...' कसोटी मालिकेनंतर वासिम जाफरची पोस्ट चर्चेत

Latest Maharashtra News Updates Live : जिल्हा परिषदेच्या चार हजार ८० जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT