पिंपरी-चिंचवड

प्रभाग क्रमांक १६ (रावेत–किवळे-वाल्हेकरवाडी) तरुण मतदारांच्या वाढत्या संख्येमुळे रावेत–किवळे-वाल्हेकरवाडी प्रभागाचा राजकीय पटच बदलतोय

CD

प्रभाग १६ ः रावेत-किवळे-वाल्हेकरवाडी

तरुण मतदारांमुळे
राजकीय पटात बदल
- संदीप भेगडे

म हापालिकेतील प्रभाग १६ मध्ये गेल्या काही वर्षांत झपाट्याने नागरीकरण झाले आहे. नवीन गृहनिर्माण सोसायट्या, आयटी क्षेत्रातील व्यावसायिक आणि तरुण मतदारांच्या वाढत्या संख्येमुळे प्रभागाचा राजकीय पटच बदलला आहे. जुन्या पारंपरिक मतदारांसोबत नव्या वसाहतींमधील नागरिकांचा कल निवडणुकीचा निकाल ठरविण्यात निर्णायक ठरणार आहे. या मतदारसंख्येतील वाढीमुळे राजकीय पक्षांनी या भागांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. आयटी, सेवा आणि व्यवसाय क्षेत्राशी निगडित मतदार आहे.

समाविष्ट भाग
वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा परिसर, नॅनोहोम सोसायटी, शिंदे वस्ती, रॉयल कासा, सेक्टर २९ रावेत, नंदगिरी सोसायटी, विकासनगर, क्रिस्टल सिटी, के व्हिले सोसायटी, के टाऊन, सिल्व्हर ग्रेसिया, भासलचंद्र विहार, सेलेस्टीयल सिटी फेज-२, फेलिसिटी सोसायटी आणि मामुर्डी- किवळे परिसर.

पक्षीय स्थिती
- सोसायट्यांतील सुशिक्षित मतदारवर्गाशी संवाद साधण्यात भाजप सक्रीय
- राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये उमेदवार निवडीवरून संभ्रम
- शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे मतदारांशी संपर्क वाढविण्यासाठी प्रयत्न
- काँग्रेस गोटात शांतता, मात्र काही कार्यकर्ते स्वतंत्ररीत्या सक्रीय

दृष्टिक्षेप
- विकासाभिमुख विचारांना प्राधान्य
- आरोग्य सुविधा, स्मार्ट सिटी प्रकल्प, रस्ते आणि वाहतूक सुलभतेवर भर
- नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्यात अद्याप अडथळे
- नवमतदारांकडे निर्णायक क्षमता

प्रचारातील संभाव्य मुद्दे
- विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा
- सोसायट्यांचे प्रश्न, वाहतूक कोंडी
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बोर्ड परीक्षांचे 'फायनल' वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेपासून परीक्षा सुरू

Chh. Sambhajinager Crime: भाजी विक्रेत्यावर सपासप वार; तोंडाला रुमाल बांधून फिल्मी स्टाइल हल्ला करीत घेतला जीव

Latest Marathi News Live Update : धाराशिवच्या ₹140 कोटींच्या कामावरून महायुतीत वादाचा भडका

Sugarcane Protesters : शिरोळमध्ये ऊस आंदोलक आणि दत्त कारखाना समर्थकांत झटापट, धनाजी चुडमुंगेंना ढकलाढकली

पैसे, रेशनसाठी आईनंच लेकीला विकलं; ७० वर्षीय वृद्धाचा १० वर्षीय चिमुकलीवर २ वर्षांपासून अत्याचार

SCROLL FOR NEXT