पिंपरी-चिंचवड

देहूरोड कॅन्टोन्मेंट-पालिका ब क्षेत्रीय आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

CD

देहूरोड, किवळे, ता. ८ : देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत कचरा संकलन खासगी ठेकेदारामार्फत केले जाते. महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करूनही येथे समाधानकारक स्वच्छता दिसत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कॅन्टोन्मेंटच्या सातही वॉर्डात अनेक ठिकाणी कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने रस्त्यांवर ढीग साचले आहे. दाभाडे माळवाडीच्या सीमा, आंबेडकर रस्ता, देहूरोड महामार्ग, मंडई, विकासनगर, चिंचोली आणि सिद्धि विनायकनगरीच्या दत्तनगर भागात सकाळी उशिरापर्यंत कचरा उचलला जात नसल्याने रोगराईची भीती वाढली आहे.
किवळे, मामुर्डी परिसरातही समस्या गंभीर आहे. देहूरोड सेंट्रल ते साईनगर आणि वनराई रस्त्यावर नागरिक कचरा टाकतात.
गहुंजे ग्रामपंचायतीकडून साईनगर, गहुंजे रस्त्यावरील खासगी दुकानांसमोरील कचरा उचलला जात नसल्याची तक्रार वाढली आहे. कुणाल आयकोनिया परिसरातील सेवा रस्त्यासह किवळे एम.बी. कॅम्प परिसरातही अशीच परिस्थिती असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रमुख समस्या
• कॅन्टोन्मेंट हद्दीत ठेकेदार असूनही स्वच्छता अपुरी
• अनेक रस्त्यांवर कचऱ्याच्या ढीगाचा त्रास
• किवळे-मामुर्डीत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण जास्त


साईनगर-गहुंजे रस्त्यावर अनेक दिवसांपासून कचऱ्याच्या पिशव्या पडून आहेत. परिसरातील लोकसंख्या वाढली आहे, अशा परिस्थितीत रोगराई पसरण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने कचरा नियमित उचलून स्वच्छतेला प्राधान्य द्यावे.
- वंदना तरस, रहिवासी साईनगर, मामुर्डी


एम. बी. कॅम्प परिसरातील कचऱ्याची समस्या नवीन नाही. रस्त्यालगतच कचरा टाकला जातो. यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
- ॲड. प्रभा तरस, किवळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT