पिंपरी-चिंचवड

निगडी बस आगारासमोरचे धोकादायक खड्डे बुजविले

CD

सकाळ इम्पॅक्ट

किवळे, ता. ४ : निगडी येथील भक्ती-शक्ती चौकाजवळील पीएमपी बस आगाराच्या प्रवेशद्वारासमोर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाल्याबाबत ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची तत्काळ दखल घेत संबंधित यंत्रणेने हे खड्डे बुजविले.
बस आगाराच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्याच्या मध्यभागी मोठे खड्डे पडल्याने बस चालक, दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला होता. विशेषतः गर्दीच्यावेळी अचानक ब्रेक लागणे, वाहनांचे संतुलन बिघडणे अशा घटना घडत होत्या. याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या समस्येकडे लक्ष वेधताना डॉ. मनस्वी धंदल यांनी,
बस आगारासमोरच खड्डे असणे म्हणजे अपघाताला निमंत्रण आहे. प्रशासनाने वेळीच कारवाई करावी, अशी मागणी केली होती. तर विशाल खाणेकर यांनीही दररोज शेकडो वाहने या मार्गावरून जातात. तातडीने दुरुस्ती न झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा दिला होता.
KIW26B05317

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूने फुंकले रणशिंग

'बिग बॉसमध्ये गेल्यामुळे मेंदूला किडे लागले...' उषा नाडकर्णी म्हणाल्या...'मला त्यावेळी खूप त्रास...'

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील डॉक्टर ताब्यात

Sangli Agents Stuck : इस्रायल–इराण संघर्षाच्या छायेत सांगलीतील १० विमा प्रतिनिधी दुबईत अडकले; एअर इंडियाचे उड्डाण रद्द

SCROLL FOR NEXT