पिंपरी-चिंचवड

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याशी अखंड हरिनाम सप्ताह व भव्य गाथा पारायण सोहळा २२ ते ३१ जानेवारीदरम्यान वारकरी संप्रदायाचा वैभवी धार्मिक महोत्सव

CD

माघ शुद्ध दशमी वारीनिमित्त ‘संत महिमा उत्सव’


श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याशी २२ जानेवारीपासून हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा

देहूरोड, ता. १० : संत तुकाराम महाराज यांच्या माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने भरणाऱ्या भंडारा डोंगराच्या वारीचा सोहळा यंदा २२ ते ३१ जानेवारी दरम्यान होणार आहे. यंदा हा सोहळा श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याशी होणार असून, त्यात अनेक संतांचा महिमा उत्सव आयोजित केला आहे. श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने होणाऱ्या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद आणि संयोजक ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी दिली.
श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थान मावळ, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू, श्रीक्षेत्र घोरावडेश्वर डोंगर आणि श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर या विश्वस्तांच्या सहकार्याने हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यात पर्यावरण सप्ताहातून कीर्तनकारांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संतांच्या जयंती व समाधी सोहळ्यांचे औचित्य
या सोहळ्यानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा जन्मोत्सव, श्री संत नामदेव महाराज, संत जनाबाई यांच्यासह १४ संतांचा ६७५ वा समाधी सोहळा, संत सावता महाराज यांचा ७७५ वा जन्मोत्सव, संत जनार्दनपंत देशपांडे देवगिरी यांचा ४५० वा संजीवन समाधी सोहळा, श्री संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळा तसेच तपोनिधी नारायण महाराज देहूकर यांचा ३७५ वा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.

देहू ते भंडारा डोंगर मिरवणूक
देहू ते भंडारा डोंगर पायथ्यापर्यंत २२ जानेवारी रोजी दुपारी तीन ते पाच वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यात ३७५ धर्मध्वजधारी, कलशधारी, तुलसीधारी, कीर्तनकार, टाळकरी, मृदुंग सेवक, ब्रह्मविनाधारी, चोपदार सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे तुकाराम नावाच्या ३७५, ज्ञानेश्वर नावाच्या ७५०, नामदेव नावाच्या ६७५ व्यक्ती आणि जनाबाई नावाच्या ६७५ महिला सहभागी होणार आहेत.

सोहळ्याची वैशिष्ट्ये
- पाच हजार गाथावाचक, एक हजार टाळकरी, प्रतिदिन २५ मृदुंग वादक
- चोवीस तास तास ‘ज्ञानदेव–तुकाराम’ भजन
- मुळशी तालुक्यातर्फे एक लाख भाविकांना पुरणपोळीचे भोजन
- प्रतिदिन संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्राचे कथावाचन
- २८ जानेवारी रोजी डॉ. रामचंद्र देखणे कला प्रबोधिनीतर्फे बहुरूपी भारूड कार्यक्रम
- नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा

नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा
या सोहळ्यात शांतीब्रह्म मारोती महाराज कुऱ्हेकर, बंडा तात्या कराडकर, संजय महाराज पाचपोर, जयवंत महाराज बोधले, चैतन्य महाराज देगलूरकर, अच्युत महाराज दस्तापूरकर, ज्ञानेश्वर महाराज कदम, केशव महाराज नामदास आदी नामवंत कीर्तनकारांची सेवा लाभणार आहे.


श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ः पायथ्याशी अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याची माहिती देताना निमंत्रक मंडळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : आखाती युद्धाचा फटका; टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT