पिंपरी-चिंचवड

बैलांच्या पायांना पत्री मारण्याचे काम युद्धपातळीवर

CD

किवळे, ता. १७ : कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीचा हंगाम सुरू असल्याने कारखाना परिसरात दररोज मोठ्या संख्येने बैलांना पत्री मारली जात आहे. आधुनिक यंत्रसामग्री वाढत असली तरी ग्रामीण भागात बैलगाडीचे महत्त्व अद्याप कायम असल्याचे यामुळे अधोरेखित होत आहे.
ग्रामीण भागात अलीकडच्या काळात ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. मात्र, शेतीकामासाठी पारंपरिक बैलगाड्यांचा वापर करण्याची पद्धत अजूनही पाहायला मिळते. शेतीकाम करताना तसेच खडबडीत रस्ते, दगडी भाग आणि उसाने भरलेली जड बैलगाडी ओढताना बैलांच्या पायांना इजा होण्याची शक्यता असते. ही इजा टाळण्यासाठी तसेच चालताना पकड मजबूत राहावी, त्यांची दमछाक कमी व्हावी, यासाठी पायाला लोखंडी पत्री बसविण्याची प्रथा आजही कायम आहे. सध्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा ऊस तोडणी हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात मजूर येथे वास्तव्यास असून ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टरसोबत अनेक ठिकाणी अजूनही बैलगाड्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे बैलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या पायाला पत्री मारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.


कौशल्यपूर्ण काम
बैलांच्या पायाला पत्री मारण्याची प्रक्रिया मात्र कौशल्यपूर्ण आणि अनुभवाची असते. प्रथम बैलाला सावधपणे जमिनीवर पाडले जाते. दोन ते तीन शेतमजूर दोरीच्या साहाय्याने बैलाला घट्ट पकडून ठेवतात. त्यानंतर अनुभवी कारागीर चारही पायांमध्ये योग्य मापाची पत्री बसवतो. बैलाला इजा होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. या कामासाठी ताकद, अनुभव आणि प्राण्यांच्या स्वभावाची अचूक जाण आवश्यक असते. हे पारंपरिक कौशल्य जपणाऱ्या कारागिरांना सध्या मोठी मागणी वाढली आहे.


बैल शेतकऱ्याचा खरा साथीदार आहे. ऊसाने भरलेली बैलगाडी ओढताना दगडी रस्त्यामुळे पायाला जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही पारंपरिक पद्धतीने बैलांच्या पायाला पत्री मारतो. हे काम अनुभवाचे असून बैलाला इजा होऊ नये यासाठी काळजीपूर्वक काम करावे लागते. योग्य पद्धतीने पत्री मारली, तर बैल सुरक्षितपणे चालू शकतो आणि काम करताना त्याला त्रास होत नाही.
- ज्ञानेश्वर रंधवे, पत्री कारागीर
KIW26B05433

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT