पिंपरी-चिंचवड

नव्या पदपथावर लगोलग अतिक्रमण, नागरिक संतप्त

CD

किवळे, ता. २६ : किवळे-निगडी बीआरटी मार्गावरील भीमाशंकरनगर परिसरातील शेवटच्या बसथांब्याजवळ महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून नुकताच नवीन पदपथ तयार करण्यात आला. मात्र या पदपथावरच काही व्यावसायिकांनी टेबल-खुर्च्या मांडत अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भीमाशंकरनगर चौक, आदर्श नगर, किवळे परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, पदपथ तयार झाल्याने नागरिकांना सुरक्षितपणे चालण्याची सुविधा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती. परंतु संबंधित ठिकाणी काही टपरीधारक व व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानांसमोरच पदपथावर बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पदपथ मोकळा करून देण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आला आहे.

अतिक्रमण निर्मूलनाकडे दुर्लक्ष
स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, महापालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेला पदपथ हा नागरिकांसाठी आहे की व्यवसायासाठी ? महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे वाहन परिसरात वारंवार दिसत असतानाही अशा उघड अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मागण्या काय ?
- पदपथावरील व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करावी
- जागा भाड्याने देणाऱ्या संबंधित मालकांनाही नियमांचे पालन करण्यास भाग पाडावे

महापालिकेने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पदपथ तयार केला आहे. मात्र काही व्यावसायिकांनी पदपथावरच टेबल-खुर्च्या ठेवून अतिक्रमणे केल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून प्रशासनाने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.
- मुकुंद पंडित, स्थानिक नागरिक

लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या पदपथाचा मूळ उद्देशच हरवला आहे. अतिक्रमण विभागाचे वाहन परिसरात येते. मात्र, अशा उघड अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे.
- संदीप तरस, सामाजिक कार्यकर्ते

केवळ फलक जप्त
काही व्यावसायिकांचे फलक जप्त केले आहेत. तसेच पदपथावर अतिक्रमणे करून वाहतुकीस व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करू नये, अशा सक्त सूचना संबंधित व्यवसायिकांना देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली.
KIW26B05462

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT