किवळे, ता. १ : गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध नावीन्यपूर्ण वैज्ञानिक मॉडेल्स, प्रयोग सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अभियंता शैलेश कुलकर्णी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, उर्जा बचत, रोबोटिक्स, स्मार्ट सिटी संकल्पना, विज्ञानाधारित उपकरणे अशा विविध विषयांवर आधारित मॉडेल्स सादर केली. विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि संशोधनाची प्रेरणा मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश होता, अशी माहिती निमंत्रक साहेबराव बोडके यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.