देहूरोड, ता. २१ : सध्या उन्हाळ्यात सकाळपासूनच तापमानाचा पारा वाढत असून त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. शाळेत ये-जा करताना विद्यार्थ्यांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्याची मागणी देहूरोड, किवळे परिसरातील पालकांकडून केली जात आहे.
दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांची अवस्था अधिकच बिकट होत असून थकवा, डोकेदुखी आणि डिहायड्रेशनच्या तक्रारी वाढल्या आहेत. पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.