देहूरोड, ता. २३ : पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत देहू कमानीसमोर होणारी वाहतूक कोंडी वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची वाढती संख्या आणि सेवा रस्त्यांचा अभाव यामुळे या परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर देहू कमानीसमोर भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निगडी ते देहूरोड या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या अनुषंगाने २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंट रुग्णालय ते देहू फाटा या दरम्यान उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १५२ कोटी रुपये असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र पूल कॅन्टोन्मेंट रुग्णालय ते रेल्वे पुला पर्यंतच करण्यात आला.
देहू फाट्यासह पुणे गेटजवळ, सेंट्रल चौक, मामुर्डी ते सेंट्रल चौक, साईनगर ते सेंट्रल चौक आणि अमरदेवी मंदिर ते सेंट्रल चौक या ठिकाणी सेवा रस्त्यांची मागणी करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
देहू फाट्यासह पुणे गेटजवळ, सेंट्रल चौक, मामुर्डी ते सेंट्रल, साईनगर ते सेंट्रल आणि अमरदेवी मंदिर ते सेंट्रल या ठिकाणी सेवा रस्त्यांची मागणी केली आहे. साईनगरकडे जाणाऱ्या कॉर्नरला हायमास्ट दिवे, आवश्यक ठिकाणी गतिरोधक आणि अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी एमएसआरडीसी आणि आयआरबीकडे पत्राद्वारे केली आहे.
- नितीन अंबोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, देहूरोड वाहतूक विभाग
वाढत्या वाहतुकीच्या दृष्टीने अरुंद पडणारे रस्ते रुंद करण्याची गरज आहे. यासोबतच गरजेच्या ठिकाणी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग केले जावेत. सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, ही सरकारची जबाबदारी आहे.
- ललितकुमार काळे, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.