पिंपरी-चिंचवड

रावेत - किवळे गावठाण रस्त्यावर खड्डे, धूळ

CD

किवळे, ता. २९ : रावेत गावठाण ते किवळे गावठाण या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील ग्रामदैवत धर्मनाथ महाराज उड्डाणपुलाच्या अलीकडे आणि पलीकडे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांचीही अवस्था खराब झाली असून, परिसरात सर्वत्र धूळ पसरत आहे. त्यामुळे वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रावेत गावठाण ते किवळे गावठाण दरम्यान मळेकर वस्तीच्या हद्दीत काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पुढे भोंडवे वस्ती परिसरातही काही ठिकाणी खड्ड्यांची समस्या आहे.
कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील धर्मनाथ महाराज उड्डाणपुलाजवळ रस्त्याची स्थिती अधिक खराब झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना मुख्य रस्त्यासह सेवा रस्त्यांचीही दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत आणि धुळीचा त्रास कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहर सचिव दीपक भोंडवे यांनी केली आहे.

रावेत गावठाण ते किवळे गावठाण रस्त्यावरील खड्डे संबंधित ठेकेदाराला दाखविले आहेत. या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम केले जाईल.
- स्वप्नील शिर्के, उपअभियंता (स्थापत्य), ‘ज’ क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड महापालिका
फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

Latest Marathi News Update: आदिवासी महिलेचे चोरी झालेले मंगळसूत्र मिळाले

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

SCROLL FOR NEXT