School sakal
पिंपरी-चिंचवड

Shirgaon News : वाढीव अनुदानापासून पाच शाळा वंचित

शहरी भागासाठी असलेला नियम ग्रामीण व डोंगरी भागासाठी लावून मावळमधील पाच शाळा गेल्या अडीच वर्षांपासून वाढीव अनुदानापासून वंचित ठेवण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

शिरगाव - शहरी भागासाठी असलेला नियम ग्रामीण व डोंगरी भागासाठी लावून मावळमधील पाच शाळा गेल्या अडीच वर्षांपासून वाढीव अनुदानापासून वंचित ठेवण्यात आल्या आहेत. या पाचही शाळांमधील सुमारे ३३ ते ३५ शिक्षक गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालय, शिरगाव, उषाताई लोखंडे माध्यमिक विद्यालय सांगीसे, वारू कोथुर्णे माध्यमिक विद्यालय, वारू कोथुर्णे, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, घोणशेत, स्व.वामनराव हैबतराव देशमुख माध्यमिक विद्यालय, देवघर आदी शाळा अंशतः अनुदानित तत्वावर चालतात. ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यानंतर या शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचा निर्णय घेतला.

त्यामध्ये, मावळ तालुक्यातील इयत्ता १० वीच्या वर्गात ३० पटसंख्या असणाऱ्या शाळांना अनुदान मिळाले. परंतु, पाच शाळा अशा होत्या; ज्यांच्याकडे ३० पटसंख्या नाही, असे शहरी भागासाठी असणाऱ्या नियमाचे कारण देत शाळा वाढीव अनुदानासाठी अपात्र करण्यात आल्या होत्या.परंतु, शाळांमधील शिक्षक गेल्या दोन वर्षांपासून अनुदानापासून वंचित आहेत.

संबंधित शाळेचे शिक्षक गेली दोन वर्षे माझ्या संपर्कात आहेत. त्यांच्या प्रश्नांबाबत लक्षवेधी मी अधिवेशनात मांडली होती, परंतु, शासनाने ती घेतली नाही. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर मार्ग काढण्याची विनंती करणार आहे.

- जयंत असगावकर, आमदार, शिक्षक मतदार संघ, पुणे

जर अशा काही शाळा राहिल्या असतील; तर राज्यात अशा किती शाळा आहेत, हे तपासून घ्यावे लागेल, असे काही शाळांना अनुदान देता येत नाही. त्यामुळे, काय झाले आहे हे तपासून निर्णय घेऊ.

- दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

Maharashtra Monsoon: मुसळधार पावसानंतर अचानक उघडीप! घाटमाथा-कोकणात पावसाचा जोर ओसरला; IMD ने सांगितले कारण

India vs England ODI : इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, कारण काय?

Pune Heavy Rain: अतिवृष्टीचा फटका! शिनोली-भोजनेवाडी मार्गावर दरड कोसळली; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर चार मिनिटं हवेतच, एकाच ठिकाणी घिरट्या, नेमंक काय घडलं?

SCROLL FOR NEXT