veer seva dal tree plantation
esakal
वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त 'एक पेड वीराचार्य के नाम' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. वीर सेवा दल शाखा PUNE-PCMC यांच्या वतीने पुनावळे येथील ऑक्सिजन पार्कमध्ये हा वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.
tree plantation
या उपक्रमांतर्गत १६ ऑगस्ट रोजी वीर सेवा दलाच्या वतीने ६५ देशी वृक्षांची रोपे उपलब्ध करून देण्यात आली. यासोबतच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या वीरसैनिकांनी श्रमदान करत ऑक्सिजन पार्कमध्ये तब्बल ७०० झाडांचे वृक्षारोपण केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वीराचार्यांच्या स्मृतींना पर्यावरणपूरक पद्धतीने अभिवादन करण्यात आले.
tree plantation.jpeg
या उपक्रमात वीर सेवा दल शाखा PUNE-PCMC चे संघनायक प्रमोद पाटील, सुदर्शन वाकरे, प्रणव पाटील, अशोक खोत, पंकज जैन, सूरज खोत, अक्षय लखणे, संयम मगदुम आणि प्रतीक पाटील यांच्यासह शाखेतील वीरसैनिक आणि श्राविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या स्मृती जपत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प प्रत्यक्ष कृतीतून साकारण्याचा हा उपक्रम ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.