पिंपरी-चिंचवड

‘कैवल्यधाम’च्या बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

CD

लोणावळा, ता. ८ : येथील जगप्रसिद्ध योग प्रशिक्षण संस्था असलेल्या संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या बोधचिन्हाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण झाले.
स्वामी कुवल्यानंद यांनी १९२४ मध्ये योगा संस्थेचे लोणावळा येथे स्थापना केली. योग क्षेत्रातील सर्वात प्राचीन संस्था असून, पुढील वर्षी शतक महोत्सव साजरा करीत आहे. शतकपूर्तीनिमित्त योग साधनेशी निगडित विविध उपक्रमांचे कैवल्यधाम संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आलेले आहे. या निमित्ताने संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘शताब्दी वर्ष बोधचिन्ह’ व शताब्दी वर्ष कार्यक्रम पत्रिकेचे राजभवन येथे राज्यपाल कोशारी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या वेळी कैवल्यधाम संस्थेचे विश्वस्त सुबोध तिवारी, केंद्र सरकारचे माजी सचिव व कैवल्यधाम संस्थेचे सल्लागार मंडळाचे सदस्य बीसी खटुआ, संस्थेचे अधिकारी रवी दीक्षित, बर्नार्ड बिट्टू , बंडू कुटे, मीनल डुगर, अश्विनी मुदलगीकर, भूमी चोक्सी, निखिल जसुजा, निशांत जैन, त्रिवेदी कार्तिक केसरकर, गौरव मशरूवाला, मयंक लुणावत आदी उपस्थित होते.
सुबोध तिवारी यांनी कार्यक्रमाची सुरुवात शांतीपाठाने करून कैवल्यधाम संस्थेची संक्षिप्त माहिती तसेच शताब्दी वर्षात आयोजित उपक्रमांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचा दिलेला संदेश संस्था योगप्रचार व प्रचार करून देश-विदेशातील कानाकोपऱ्यात योगाचा संदेश पोहोचवण्याचे कार्य करीत असल्याचे गौरवोद्‍गार काढत राज्यपाल कोश्यारी यांनी कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. सूत्रसंचालन व आभार अनिल त्रिवेदी यांनी मानले.


छायाचित्रे: LON23B02348/02349

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT