पिंपरी-चिंचवड

लोणावळ्यातील आजचा आठवडे बाजार रद्द

CD

लोणावळा, ता. ९ : लोणावळा नगरपरिषद हद्दीत भरणारा शुक्रवारचा आठवडे बाजार शुक्रवारी (ता. १०) रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दिली. नगर परिषदेच्या वतीने भांगरवाडीत भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे इंद्रायणी पूल ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान वाहतूक बंद करण्यात आली आहे. लोणावळ्यातील आठवडे बाजार हा हनुमान टेकडी समोरील रस्त्यावर भरवण्यात येतो. सर्व वाहतूक ही पुरंदरे शाळा मैदानासमोरील रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. वाहतूक या मार्गाने वळविण्यात आली असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून शुक्रवारचा आठवडे बाजार रद्द करण्यात आला. गेल्या आठवड्यातही बाजार रद्द करण्यात आला होता. आठवडे बाजार रद्द झाल्याने गैरसोय होऊ नये यासाठी बाजारातील भाजी विक्रेते, फेरीवाले, किरकोळ विक्रेत्यांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT