पिंपरी-चिंचवड

लोणावळ्यातील रस्त्याची खड्यांमुळे चाळण

CD

लोणावळा, ता. ८ : अवघ्या काही महिन्यातच लोणावळ्यात डांबरीकरण केलेल्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरक्षः चाळण झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोणावळा शहरात मे अखेरीस बाजारपेठ, भांगरवाडी, सिध्दार्थ नगर, रायवुड खोंडगेवाडी व शहरातील इतर ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, निकृष्ट कामामुळे पहिल्याच पावसात डांबरीकरण झालेले रस्ते वाहून गेले. रस्त्यावरील खड्ड्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना चालणेही मुश्किल झाल्याने नागरिकांची ओरड आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचाही धोका आहे. रायवूड येथील सिध्देश्वर मंदिर परिसर, ऑक्झिलियम कॉन्व्हेन्ट हायस्कूल समोर, ट्रायोज मॉलसमोरील गटराचे काम अर्धवट असल्याने स्थानिक नागरिक‌ व लोणावळ्यात येणारे‌ पर्यटकांना या गोष्टीचा त्रास सहन‌ करावा‌ लागत आहे.
लोणावळा शहरातील विविध नागरी समस्यांबाबत निवेदन लोणावळा शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांना निवेदन देण्यात आले. शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, मावळ तालुका सल्लागार मारूती खोले, समन्वयक जयवंत दळवी, उपशहरप्रमुख संजय भोईर, विजय आखाडे, धीरज घारे उपस्थित होते. या रस्त्यावर अशा निकृष्ट दर्जांच्या कामामुळे अपघात झाल्यास या अपघातास सदरील ठेकेदार व लोणावळा नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद नगरपरिषद प्रशासनाने लवकरात घेऊन संबंधित काम मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना‌ करण्यात आली.

छायाचित्र: LON23B02639

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Update: बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद! कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

ऑक्टोबरमध्ये येणार १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार, पेट्रोलचा खर्च फक्त २५ रुपये लीटर; गडकरींचा मोठा दावा

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Aditya Thackeray : हे सरकार निर्दयी! आदित्य ठाकरे यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT