Lonavala Expressway Traffic Sakal
पिंपरी-चिंचवड

Express Way : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनास ३ दिवस 'चार तास' बंदी : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

CD

लोणावळा, ता. १४ ः जुन्या पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर शनिवार (ता. २१) ते सोमवार (ता. २३) ऑक्टोबर दरम्यान सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर कार्ला फाटा ते वेहेरगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने नवरात्रात कार्ला फाटा ते एकवीरा देवी पायथा मंदिर रस्त्यावर अवजड वाहनांना पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात येणार आहे.


रविवारी (ता. १५) घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सवास सुरवात होणार आहे. राज्यभरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेहेरगाव, कार्ला येथील आई एकवीरा देवी व खंडाळ्यातील वाघजाई देवीच्या दर्शनासाठी नवरात्रात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. यंदाही देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यात्राकाळात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश दिले आहेत. या दरम्यान अवजड वाहतूक द्रुतगती मार्गावर वळविण्यात आली आहे.


असा आहे वाहतुकीत बदल

१) कार्लाफाटा ते वेहेरगाव एकवीरादेवी पायथा मंदिर दरम्यान रविवार (ता. १५ ) ते मंगळवारी(ता. २४) ऑक्टोबर दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी.
२) शनिवारी (ता. २१) ते सोमवारी (ता. २३) ऑक्टोबर दरम्यान वाहतूक
सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळा-कुसगाव बु. टोलनाका - वडगाव फाटा मार्गे पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक बंद करून ती खंडाळा कुसगाव बु. टोलनाका मार्गे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजूने वळविण्यात आली आहे.
३) २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत जुना पुणे-मुंबई महामार्गावरून वडगाव-तळेगाव फाटा-लोणावळा मुंबई बाजूकडे जाणारी अवजड वाहतूक बंद करून ती तळेगाव फाटा येथून उर्से खिंड, उर्से टोलनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरुन मुंबई बाजूकडे जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT