पिंपरी-चिंचवड

सीमेवरील सैनिकांची दिवाळी फराळाने गोड

CD

लोणावळा, ता.९ : देशाच्या सीमेवर प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या जवानांना दिवाळी सणाचा आनंद घेता यावा तसेच सणाचा गोडवा अनुभवता यावा, यासाठी अनाम प्रेम परिवाराच्यावतीने देशाच्या सीमेवर कार्यरत असलेल्या सुमारे २० हजार सैनिकांना दिवाळीचा फराळ पाठविण्यात आला.
अनाम प्रेम परिवार हा समाजातील दुर्बल, दुर्लक्षित व वंचितांसाठी कार्यरत असणारा परिवार म्हणून परिचित आहे. राज्य आणि देशातील काही शहरांमध्ये अनाम प्रेम परिवाराच्या वतीने सैनिकच नव्हे; तर पोलिस, बेस्टचे वाहक-चालक, अनाथ मुले, देहविक्रय करणाऱ्या निराधार महिला, रुग्णालयातील परिचारिका अशा विविध वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी उपक्रमांचे आयोजन केले जाते.
घरापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या सैनिकांना घरगुती फराळ खाण्याचा आनंद घेता यावा यासाठी फराळ पाठविण्याचा उपक्रम अनाम प्रेम परिवाराच्यावतीने गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे. यंदाही लेह, लडाख, अरुणाचल प्रदेश, आसाम, राजस्थान, जम्मू-काश्मीर, पंजाब- अमृतसर अशा सीमावर्ती भागातील सैनिकांसह नाविक दल आणि हवाई दलाच्या जवळपास वीस हजार सैनिकांना हा फराळ पाठविण्यात आला. या फराळाच्या प्रत्येक बॉक्समध्ये चिवडा, चकली, लाडू व शंकरपाळी हे पदार्थ पाठवण्यात आले.
परिवाराचे नितीन पानसे म्हणाले,‘‘स्वतःच्या परिवारापासून दूर असलेले सैनिक प्राणांची बाजी लावून देशासाठी लढत असतात. बलिदान देतात. याची जाणीव ठेवत त्यांनाही सणांचा आनंद लुटता यावा, या हेतूने मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा तसेच इतर ठिकाणांहून दिवाळीचा फराळ तयार करण्यात आला.’’

फराळाच्या बॉक्सेसबरोबर देशाच्या सीमेवरील सैनिकांसाठी मुले आणि कुटुंबील सदस्यांकडून स्वतःच्या हाताने बनवलेली शुभेच्छा पत्रे सुध्दा पाठविण्यात येत आहेत. या उपक्रमाद्वारे सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. - अनिल मोरे, सदस्य, अनाम प्रेम परिवार

LON23B03079

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT