पिंपरी-चिंचवड

कार्ला श्री एकवीरा विद्यामंदिर, लाजवंती गुप्ता कॉलेजचे यश

CD

लोणावळा, ता. १० : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या वतीने राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या वतीने शाळांकरिता राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या श्री एकवीरा विद्यामंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनिअर कॉलेजचा मावळात द्वितीय क्रमांक मिळवत घवघवीत यश मिळवले आहे.
मावळ तालुक्यातील प्राथमिक व खासगी एकूण ४२९ शाळांमधून खासगी शाळेमध्ये तालुक्यात द्वितीय स्थान मिळवले. यापूर्वी श्री एकवीरा विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थी शिष्यवृती व एनएमएसएस परिक्षेत गुणवत्ता यादीत चमकत असून पुन्हा या स्पर्धेतदेखील आपली चमक दाखवली आहे. शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक संजय वंजारे व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे यश मिळवण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, सचिव संतोष खांडगे, मावळ गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, राजेश म्हस्के, माजी सभापती शरद हुलावळे, दीपक हुलावळे, सरपंच दीपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे, केंद्रप्रमुख सुहास विटे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सर्व संचालक, पालक, कार्ला ग्रामस्थ या सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT