पिंपरी-चिंचवड

करंडोलीत ‘डीजे’ वाजविण्यावरून सहा जणांवर हल्ला; ११ अटकेत

CD

लोणावळा, ता. ८ : करंडोली येथे लग्नाच्या वरातीमध्ये लावलेल्या ‘डीजे’चा आवाज कमी करा सांगितल्याच्या रागातून टोळक्याने केलेल्या हल्ल्यात सहाजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी बारा जणांवर गुन्हा दाखल केला असून, अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अनंता केदारी, नीलेश केदारी, नरेश केदारी, सुरेश केदारी, दत्ता केदारी, अक्षय केदारी, ओम्कार केदारी, विलास गायखे, सुनील भाटवडेकर, सोमनाथ भाटवडेकर, नितीन केदारी, सुरेश केदारी (सर्व रा. करंडोली ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रवीण बाळू चांदणे (वय २८, रा. करंडोली, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘गुरुवारी (ता. ६) रात्री करंडोली येथील सोमनाथ भाटवडेकर यांच्या लग्नाच्या वरातीत मोठ्या आवाजात डीजे लावण्यात आला होता. फिर्यादी प्रवीण यांचा मुलगा लहान असून त्याला हृदयाचा त्रास असल्याने त्यांनी डीजेचा आवाज कमी करा असे सांगितले. त्याचा राग मनात धरून डीजेच्या समोर नाचणाऱ्या आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवत अमोल शेलार यांच्यावर कोयता व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. शेलार यांना वाचविण्यासाठी आलेल्या किरण चांदणे, राहुल चांदणे, निखिल चांदणे, बाळू शेलार, बेबीबाई शेलार (सर्व रा. करंडोली, ता. मावळ) यांनाही बेदम मारहाण झाल्याने ते जखमी झाले. पुढील तपास पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भारत भोसले करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT