पिंपरी-चिंचवड

आधुनिक गुरूकुल शिक्षण पद्धत हवी ः अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज

CD

लोणावळा, ता.६ : ‘‘एकेकाळी विश्वगुरूची बिरुदावली मिरवणारा भारत शिक्षण व्यवस्थेतील पाश्चिमात्यकरणामुळे आज जागतिक शिष्य बनला आहे. भारताला पुन्हा जागतिक नेता बनण्यासाठी आधुनिक गुरुकुल शिक्षा पद्धतीचा अवलंब करावा लागेल,’’ असे मत जगद्गुरू शंकराचार्य ज्योतिर्लिंगपीठाचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.
कार्ला येथील अग्रसेन भवन येथे अग्रवाल ग्लोबल फाउंडेशनतर्फे महालक्ष्मी माता शक्ती पीठ उभारणी करण्यात आली असून अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी माता मंदिराचे शनिवारी (ता.६) भक्तिमय वातावरणात लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य दाता राजेंद्र घुवालेवाला, जयकुमार गुप्ता, सुरेश भगेरिया, गौरव राजेंद्र घुवालेवाला, बंकेश अग्रवाल, हर्षवर्धन अग्रवाल, मधुसूदन अग्रवाल, संजय गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.
आज आपण जगाकडे शिकण्यासाठी जातो; मात्र भारत आपल्या वैदिक ज्ञानाने संपूर्ण जगाला दिशा देत आहे, असल्याचेही अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी यावेळी सांगितले.
महालक्ष्मी माता शक्तिपीठ उभारणीच्यानिमित्ताने प्रवचन, माता की चौकी आदी विविध धार्मिक कार्यक्रम आठवडाभर चालणार असून शुक्रवारी (ता.१२) द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वतीजी महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे. महिलांच्यावतीने एकवीरा देवी मंदिर ते अग्रसेन भवन दरम्यान १०८ कलश यात्रा काढण्यात आली.

राहुल गांधी यांच्या टिप्पणीचे समर्थन...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत हिंदूंना हिंसक म्हटल्याच्या टिप्पणीला उत्तर देताना त्यांनी राहुल यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. तसेच त्यांनी हिंदूंवर नव्हे; तर संसदेत हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजपच्या बेगडी हिंदुत्वावर हल्ला केल्याचे नमूद केले.
केंद्र सरकारच्या भूतकाळापासून आजपर्यंतच्या अनेक धोरणांवर अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT