लोणावळा, ता. ४ ः पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाटा येथे उड्डाणपूल बांधण्यासाठी ४५ कोटी रुपये, एकवीरा मंदिर परिसर विकासासाठी ३९ कोटी व कार्ला लेणीसाठी अतिरिक्त ५ कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्ला येथे केली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकवीरा देवी गडावर मंदिराचा जीर्णोद्धार, नगारखाना, स्वच्छ्ता गृह तसेच विविध विकास कामांचा प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. देवस्थानचे मुख्य विश्वस्त व खासदार सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे, खासदार श्रीरंग बारणे, देवस्थानचे विश्वस्त दीपक हुलावळे आदी यावेळी उपस्थित होते.
एकवीरा गडावर रोप वे करण्यास मंजुरी देण्यात आली असून, रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांना काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. नवरात्रीत दुसऱ्या माळेस एकनाथ शिंदे यांनी प्रथमच एकवीरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची विधिवत पूजा, आरती करत देवीस साडी - चोळी अर्पण केली. राज्यभरातून देवीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात, त्यांच्यासह परिसरातील नागरिकांना सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.