लोणावळा, ता. ५ : विद्या प्रसारिणी सभेच्या व्हीपीएस हायस्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विद्यार्थिनींसाठी महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
प्राचार्य उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक सुहास विसाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंगल जाधव, पर्यवेक्षक विजय रसाळ, श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका क्षमा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी संजीवनी आंबेकर आदींच्या उपस्थितीत गजाच्या चित्राची पूजा करत महाभोंडल्याची सुरुवात झाली. महाभोंडल्यानिमित्त कलाशिक्षक विक्रम शिंदे यांनी गजाचे सुंदर चित्र काढले. सांस्कृतिक विभाग प्रमुख धनंजय काळे, योगेश कोठावदे, संजय पालवे, वैभव सूर्यवंशी, जयवंत सिसोदे, संकेत कवडे, श्रीकांत म्हसकर, शुभांगी कडू आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. शिक्षक वृंद आणि सेवक मुकुंद जगताप, आशा गवळी आदींचे सहकार्य लाभले. शिक्षिकांनी भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हणत विद्यार्थ्यांबरोबर फेर धरत भोंडल्याचा आनंद लुटला. याप्रसंगी विद्यार्थिनींसाठी विद्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सुरक्षात्मक उपाययोजनांची पालकांना माहिती देण्यात आली.
छायाचित्र: LON24B03950
छायाचित्र: LON24B03951
लोणावळा: नवरात्रीनिमित्त येथील व्हीपीएस हायस्कूल मध्ये रंगलेल्या महाभोंडल्यात शिक्षिका व पालकांनी सहभाग घेतला
लोणावळा:
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.