पिंपरी-चिंचवड

योग हे मानसिक, आध्यात्मिक प्रगतीचे साधन

CD

लोणावळा, ता. ५ : ‘‘योग हा केवळ शारीरिक विकासाचे माध्यम नसून योग शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक प्रगतीचे साधन आहे,’’ असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.
लोणावळ्यातील कैवल्यधाम योग प्रशिक्षण संस्था ही शतक महोत्सव साजरा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर कैवल्यधामच्यावतीने ‘योग- सांस्कृतिक समन्वयाचे एक साधन’ या विषयावर लोणावळ्यात आयोजित राष्ट्रीय योग परिषदेचे उद्‍घाटन गवई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
निवृत्त न्यायाधीश एस. राधाकृष्णन, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, लेफ्टनंट जनरल डॉ.ए.के. सिंग, माजी सरन्यायाधीश रमेश धनुका, प्रा. गोपालकृष्ण जोशी, संतोष पॉल, प्रा. गिरीशचंद्र त्रिपाठी, कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव सुबोध तिवारी आदी यावेळी उपस्थित होते.
शांतीपाठाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. योगबद्दल सर्वांमध्ये विस्तृत जाणीव व्हावी तसेच योगसाधनेच्या विविध विषयांवर परिषदेत चर्चा करण्यात आली. सुबोध तिवारी यांनी संस्थेची वाटचाल विशद करत मान्यवरांना कैवल्यधाम शताब्दी वर्षाची मुद्रा देऊन सन्मानित केले. रमेश धनुका, एस. राधाकृष्णन, वैद्य राजेश कोटेचा यांनी मनोगत व्यक्त करत कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षास शुभेच्छा दिल्या. तसेच मार्गदर्शन केले. कैवल्यधाम संस्थेचा १०० वर्षांच्या प्रवासावरील दृकश्राव्य माहितीपट संक्षिप्त स्वरुपात दाखविण्यात आला. कैवल्यधाम संस्थेच्या डॉ. शरदचंद्र भालेकर लिखित व कोरियन भाषेत अनुवाद केलेले ‘योग - मुद्रा - मेडीटेशन’ तसेच डॉ. रितु प्रसाद लिखित ‘सात्विक आहार’ या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी झाले. योग शिक्षिका ममता बिश्त यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

Latest Marathi News Live Update : ठाण्याची हवा बिघडली 25 हून जास्त हॉटस्पॉट..

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

FASTag Annual Pass वार्षिक टोल पास झाला महाग, १ एप्रिलपासून नवे दर लागू

Nashik LPG Supply : नाशिककरानो घाबरू नका! जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT