पिंपरी-चिंचवड

तरुणाची खंडाळ्यातील दरीत आत्महत्या

CD

लोणावळा, ता.१७ : चाकण येथील तरुणाने खंडाळ्यातील साडेतीनशे फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरीत उडी मारण्यापूर्वी त्याने अवघ्या दोन सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यामुळे, त्याच्या मृतदेहाचे ‘लोकेशन’ समजण्यास बचाव पथकास यश आले.
सूर्यकांत रामदयाल प्रजापती (वय २७, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सूर्यकांत हा चाकण परिसरातून ९ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. त्यानंतर, चाकण पोलिसांमध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. तपासात त्याच्या मोबाईलचे शेवटचे ‘लोकेशन’ हे लोणावळा दाखविले होते.
सूर्यकांत याने आत्महत्या करण्यापूर्वी अवघ्या दोन सेकंदाचा व्हिडिओ तयार करुन तो आपल्या कुटुंबीयांच्या मोबाईलवर पाठवला होता. त्यावरून लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या बचाव पथकाने पोलिसांच्या मदतीने त्याने नेमकी कुठे आत्महत्या केली ? याचा शोध घेतला. त्यानुसार, राजमाची उद्यानालगत खोल दरीमध्ये शोध घेतला असता आठवडाभरानंतर त्याचा मृतदेह तब्बल ३७० फूट खोल दरीत कुजलेल्या अवस्थेत सापडला. प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यामुळे सूर्यकांत प्रजापती याने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याने आत्महत्या नेमकी का केली ? याचा तपास लोणावळा शहर पोलिस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Auto Rickshaw Strike : राज्यात आज रिक्षांचा संप; मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरांतील प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता

INDA vs PAKA सामन्यात राडे! वैभवला डिवचलं, हर्षित राणालाही आक्रमक सेंडऑफ, तर तिलकशीही पाकिस्तानी खेळाडू भिडले; Viral Video

Crop Insurance: रब्बीच्या सहा पिकांना विमा ,कांद्याला हेक्टरी ९५ हजार, ज्वारीला ३६ हजारांची भरपाई

Satara News: अजूनही कागदावरच ४० रुपयांत नाश्ता; एसटीच्‍या योजनेची सहा महिन्यांपूर्वी घोषणा; स्वच्छतागृहांचाही बोजवारा

Maharashtra Cold Wave : महाराष्ट्रात गुलाबी थंडीचा जोर वाढला; जळगावमध्ये नीचांकी तापमानाची नोंद, पुढील ३ दिवस कसे राहणार हवामान?

SCROLL FOR NEXT