पिंपरी-चिंचवड

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानिमित्त लोणावळ्यात तिरंगा यात्रा

CD

लोणावळा, ता. २३ : ऑपरेशन सिंदूरच्या यशानिमित्त लोणावळ्यात मावळी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये सर्व राजकीय पक्ष, लायन्स क्लब पदाधिकारी, नागरिक व माजी सैनिक सहभागी झाले होते.
ऑपरेशन सिंदूर ही पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना व भारतमातेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांना श्रद्धांजली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मावळी पुतळा येथून पदयात्रेची सुरुवात होऊन जयचंद चौक, बाजारपेठ, गुरुद्वारामार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप झाला. यावेळी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान, नेत्यांनी भारताच्या सैनिकांचे कौतुक केले. याप्रसंगी माजी सैनिक बाळासाहेब कडू, महेश थत्ते, एच. सी. शर्मा तसेच विद्यार्थिनी वसुंधरा शिळीमकर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, वृंदा गणात्रा, योगिता कोकरे, श्रीधर पुजारी, दादा धुमाळ, बाबा शेट्टी, अरविंद कुलकर्णी, रामविलास खंडेलवाल, राजाभाऊ खळदकर, देविदास कडू, नारायण पाळेकर, अनंता गायकवाड, संजय भोईर, कमुभाई जसदनवाला, अमीन वाडीवला, विजय सिनकर, दिलीप गुप्ता, अर्जुन पठारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

Shraddha Chopde: 'ज्युदोच्या मॅट'वर शेतकरी कन्येचा सुवर्ण हुंकार! महाराष्ट्राची कन्या श्रद्धा चोपडे पदक जिंकण्यासाठी ग्लासगोला रवाना

Gang Rivalry Foiled: कृष्णा आंदेकरवरील गोळीबाराचा कट उधळला; नंदुरबारला जाताना पोलिस व्हॅनवर हल्ल्याची होती योजना

Shirur Temple Robbery: शिरूर जैन मंदिर दरोडा प्रकरणी तिघांना २५ महिन्यांचा कठोर कारावास; भाविकांत समाधान

SCROLL FOR NEXT