पिंपरी-चिंचवड

लोणावळ्यातील भुशी धरण ‘ओव्हर फ्लो’

CD

लोणावळा, ता. १६ ः लोणावळ्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेले भुशी धरण सोमवारी (ता. १६) सकाळी ओसंडून वाहू लागले.
लोणावळा परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे डोंगर दऱ्यातील धबधबे, ओढे नाले खळाळून वाहू लागले आहे. सोमवारी लोणावळ्यात सकाळी १४३ मिलिमीटर तर एकूण ७९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण भरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांसह पर्यटकांनी सांडव्यावर बसून भिजण्याचा आनंद लुटला. धरणाची साठवण क्षमता ०.५० दशलक्ष घनमीटर आहे. भुशी धरणाची साठवण क्षमता फारशी मोठी नसल्याने मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसाने धरण भरते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. पण पावसाने ओढ दिल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. भुशी, पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, लायन्स पॉइंट, आतवण तसेच जांभुळणे भागात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरण भरल्याने व्यावसायिक तसेच लोणावळेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

छायाचित्र: LON25B04343/04344
लोणावळा : सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पर्यटकांचे पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरण सोमवारी सकाळी भरून वाहू लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT